विनोदी मराठी चारोळ्या (Vinodi Marathi Charolya)
बायकोने लाटणे फ़ेकले
तरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाही
कि नव-याला ईजा होत नाही.
तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही,
कारण तुझ्या शरिराचा व्यास त्या
इवल्याशा मशिनवर मावत नाही.
जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या
सिमा पार होत होत्या.