* अभ्यंग-स्नान- का व कसे? - स्नेहा राईरीकर
संस्कृती, स्वास्थ्य, सौंदर्य या तीनही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. संस्कृतीमध्ये स्वास्थ्य व सौंदर्य या दोनही गोष्टींचा अंतर्भाव
झालेला आहे. स्वास्थ्य हे आंतरिक सौंदर्य (मनाचे) व बाह्य सौंदर्य या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते. सध्याच्या धावपळीच्या दिवसांत
झटपट प्राप्त होणाऱ्या बाह्यसौंदर्यावर जास्त भर दिला जातो व त्यामुळेच अनेक ब्यूटीपार्लर्स व "स्पा' जागोजागी उघडली जात आहेत. पण
भारतीय संस्कृतीमध्ये घराघरांतून अशा स्वरूपाची पार्लर व "स्पा' अनेक वर्षांपासून आहेत. दिवाळीमधील अभ्यंग, स्नान, उटणे लावणे या
गोष्टीमध्ये सौंदर्य व स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींचा लाभ घरच्या घरी होऊ शकतो.
दिवाळीची सुरवात शरद-ऋतूच्या मध्यावर होते. नुकताच पावसाळा संपत आलेला असतो व पावसाळ्यातील वायूच्या प्रभावाने शरीराला
रुक्षता व दुर्बलता आलेली असते. ही दुर्बलता व रुक्षता कमी करून शरीराला सुदृढ व कुठल्याही प्रकारचा आघात सहन करण्यासाठी
स्नायूंना बळकटी मिळवून द्यायची असेल तर अभ्यंग आवश्यक आहे. नवजात शिशूपासून सर्वच वयाच्या लोकांना अभ्यंगाने फायदे मिळू
शकतात.
काही काळापुर्वी साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातील आपल्या लेखामध्ये डॉ. अतुल भोळे यांनी अभ्यंग स्नानाचे महत्व, त्याचे फायदे
याचे विवेचन केले होते. ऐकुया आजच्या ऑडीओ बुलेटीनमध्ये...
* अभ्यंग-स्नान- का व कसे? *