Bhushan

* कम्पॅटिबिलिटीच महत्त्वाची *
 
खरं तर माझ्या लग्नाविषयी मी तसं काही ठरवलेलं नव्हतं. माझं लग्नाचं वय झालं होतं आणि घरून काही स्थळं बघण्याचं कामही चाललेलं होतं. पण कविताला भेटेपर्यंत मला तसं कोणी पसंत पडलेलं नव्हतं. कविताशी लग्नाचं ठरवलं तेव्हा तिच्या क्षेत्राविषयी फार वेगळं वाटलं नाही. शिवाय मी ऍडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात काम करत असल्याने ग्लॅमर मला नवं नव्हतंच. कविताची आणि माझी पहिली भेट होण्यापूर्वी प्राजक्ता कुलकर्णी म्हणजे माझ्या वहिनीनं मला अचानक एक दिवस फोनवर विचारलं, ""तुला कविता कशी वाटते?'' मला एकदम कळलंही नाही. मी तेव्हा एक तर चेन्नईत होतो.

त्यामुळे मी सरळ विचारलं, ""कोण कविता?'' कारण त्याआधी मी तिचं एकही नाटक, सिनेमा किंवा सीरियल बघितलेली नव्हती. मग मी दसऱ्याच्या सुमाराला जेव्हा मुंबईला आलो तेव्हा आमची भेट प्राजक्ताने घडवून आणली. मी, प्राजक्ता, तिचा नवरा राजन, कविता आणि राजन भिसे भेटलो. भेटलो म्हणजे काय.. तीच जास्त बोलत होती आणि त्यांच्याच सगळ्या गप्पा चालल्या होत्या. मी फक्त ऐकत होतो. पण मला ती आवडली. त्यानंतर मी तिचं नाटक पाहिलं, आणि तेही आवडलं. मग दुसऱ्या दिवशी घरी आई-वडिलांना सांगितलं आणि लगेच चेन्नईला गेलो. त्यामुळे नंतरच्या काळात मोबाइल फोन हेच आमचं संवादाचं माध्यम राहिलं. फोनवर मात्र आम्ही खूप बोलायचो. त्या वेळेला तिची "सुंदर मी होणार' आणि "एका लग्नाची गोष्ट' अशी दोन नाटकं चालू होती. मलाही दिवसभर खूप काम असायचं. पण रात्री उशिरा आम्ही गप्पा मारायचो. त्यातून अर्थातच एकमेकांना जाणून घ्यायचाच प्रयत्न असायचा.

लग्नाच्या पद्धतीविषयी सांगायचं, तर प्रेमविवाह केला तर तो टिकतो किंवा ऍरेन्ज्ड मॅरेज असेल तर त्यात प्रॉब्लेम्स येतात, असं म्हणण्याला तसा काही अर्थ नाही. कारण ते प्रत्येकावर अवलंबून असतं. प्रेम वगैरे सगळे ठीक असतं, पण तेही जोपर्यंत एकत्र राह्यला सुरुवात करत नाही तोपर्यंतच. एकदा संसार सुरू झाला की साधं बाथरूम वापरण्यापासून ते घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत कशावरूनही खटके उडू शकतात. मग ते ऍरेन्ज्ड असो की लव्ह मॅरेज! शेवटी तुम्ही एकमेकांना किती कम्पॅटिबल आहात यावरच तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. तुम्ही किती समजून घेता, एकमेकांशी किती ऍडजस्ट होता किंवा किती तडजोड करता यावरच संसाराचं यश अवलंबून असतं

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,