shweta_21

माझ्या आवडीचे उर्दुतले काही शेर मराठीत भाषांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे...


अस्मानातली बिजली जेथे धरतीवरती नाचे
तिथेच मजला आहे माझे घरटे बांधायाचे

आपुल्या आपुल्या मस्तीमध्ये तुडवुनी गेलो ज्याला
कळले हे आत्ताच मला की "दुनिया" म्हणती त्याला

जन्मलो जेव्हा होता तेव्हा हात हा ह्र्दयावरती
बहुदा होती तेव्हापासुन ह्र्दयी माझ्या प्रिती