Manasi


Please vote for  Riya

http://www.google.com/intl/en_in/doodle4google/vote.html#d=d3-13

 

इंटरनेटच्या महाजालात हवी ती माहिती शोधून देणारी 'दौपदीची थाळी' ठरलेल्या 'गुगल'च्या होमपेजवर नाशिकच्या रिया जाधव या विद्याथीर्नीने साकारलेले डूडल झळकण्याची संधी निर्माण झाली आहे. एखादे विशेष औचित्य साधत त्याची अभिव्यक्ती गुगलच्या लोगोतूनच डूडलद्वारे साकारली जाते. गुगलने भारतातील पहिली ते दहावीच्या मुलांसाठी घेतलेल्या 'डूडल फॉर गुगल' या स्पर्धेत सहभागी झालेल्या चार हजार जणांमधून निवडण्यात आलेल्या ४४ फायनलिस्टमध्ये नाशिकच्या रियाचाही समावेश आहे.

वैज्ञानिक, कलाकार, स्थानिक सण-उत्सव, विशेष दिवस यांचे प्रतिबिंब गुगलच्या लोगोत पडावे म्हणून गुगुलचे डूडलर डेनिस वाँग हिकमती लढवत असतात. असेच डूडल तयार करण्याची संधी गुगलने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी 'माय इंडिया' ही थीम देण्यात आली असून संगीत, नृत्य, विख्यात भारतीय कला, महात्मा गांधी, ताज महाल, क्रिकेट, वैज्ञानिक कामगिरी किंवा भारतीय समाज या विषयांचा त्यात समावेश आहे.

या स्पर्धेसाठी देशभरातल्या सुमारे चार हजार मुलामुलींनी भाग घेतला. त्यातून सहाशे सेमी फायनलिस्ट निवडण्यात आले. त्यातून सोळा फायनलिस्टची निवड करण्यात आली या फायनलिस्टनी साकारलेले डूडल्स गुगलच्या साईटवर प्रदशिर्त करण्यात आले असून त्यावर भारतीयांकडून मत मागविण्यात आली आहेत. नेटीझन doodle4googleIndia असा सर्च देऊन व्होट करू शकतो. तिथेच सातवी ते दहावीच्या गटात नाशिकची रिया जाधव ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक असून तिला येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंतच मत देता येईल.

नाशिकच्या सेंट फ्रान्सिस शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या रियाने डूडलसाठी महात्मा गांधींच्या आकृतीचा वापर करून 'से नो टू वॉर, जस्ट पीस' असा संदेश दिला आहे. 'खूप मुलांनी जातीधर्मावर आधारीत डूडल्स बनवली. पण, भारत म्हटला की आधी गांधीचींचे नाव येते, असे वाटल्यानेच त्यांची आकृती मी वापरली', असे सांगणाऱ्या रियाला तिचे कलाशिक्षक दीपक राजपूत आणि प्राचार्या रिना बिश्वास यांनी मार्गदर्शन केले आहे. विजेत्याचे डूडल बालदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला गुगलच्या होमपेजवर झळकणार आहे. विजेत्याला गुगलकडून एक लॅपटॉप व शाळेला एक लाख रुपयांची टेक्नॉलॉजी ग्रँटही देण्यात येणार आहे.simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,