
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
आयुष्यात ” श्री स्वामी समर्थाची सेवा व निश्चित धेय” असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर कठीण आगीच्या रस्त्यावर प्रगति करेल.पण धेयशुन्य ज्याला स्वतःच्या जीवनामध्ये त्याचे ध्येय माहित नाही आणि नास्तिक माणुस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहचणार नाही आणि कोणत्याही मोठ्या शिखरावर पोहोचणार नाही.आपले धेय आजच ठरवा.!! आपले ध्येय फक्त स्वामी समर्थ, स्वामी समर्थ आण
ि स्वामी समर्थ. श्री गुरुदत्त स्वामी समर्थांच्या आशीर्वाद आणि कृपादृष्टी मुलेच आपल्या कार्यप्रांतात प्रगती होते. स्वामी कृपे शिवाय कोणताही माणूस काहीही करू शकत नाही. साधी झाडाचे पान सुद्धा स्वामींच्या मार्झी शिवाय हलत नाही. स्वामी समर्थच ह्या जागा वर सत्ता चालवत. ते आज हि आपल्या भक्तासाठी ह्या भूलोकी भ्रमण करतात. आणि आपल्या भक्ताची चिंता दूर करतात आणि सदैव त्याला सुखी ठेवतात.
श्री स्वामी समर्थांना "चमत्कार करणे" हे केव्हाच मान्य नवते. ते नेहमी म्हणत कि चमत्कार करायचा नसतो चमत्कार आपोआप व्हावा लागतो तो हि भक्ताच्या कल्याणासाठीच. त्याचा उद्धार होण्या साठी, त्याला भरकटलेल्या मार्गा वरून सरळ मार्गावर आणण्यासाठीच. आणि स्वमी कधीही चमत्कार करत नसत तर त्यांची भक्त वर कृपा होत असत.
स्वामिनी नास्तिकाला आस्तिक बनवले, सदभक्ताचे कल्याण केले, आणि गर्विष्टाला तडाखे देऊन त्याला मार्गावर आणीत.
“जो|| श्री स्वामी समर्थ || महाराज्यांच्या चरणी मनापासून शरण जाइल ,महाराज त्याच्या योगक्षेम निश्चित चालवतात,व सदैव त्याच्या पाठीशी असतात.”
” श्रद्धा,सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठायी आहे तो वर सर्व बाजूंनी भरभराटच होइल हे निश्चित,अशक्य ही शक्य करतील स्वामी"
श्री स्वामी समर्थांनी समाधी घेण्याआधी वचन आपल्या भक्त दिले होते....
" मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. घाबरू नका. फक्त नित्य नियमाने माझी भक्ती करावी त्याचे मी सदैव रक्षण करीन सदैव त्याचा पाठीशी राहीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे."
अनन्याश्चीतयन्तो मां ये जनाः पर्युपासते l
तेषाः नित्यभियुक्तानाः योगक्षेमं वहाम्यहम l
--------------------------------------------
मित्रानो-मैत्रिनिनो ह्या वचना वरून आपल्याला बोध होतो कि श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तापाठी नेहमी कोणत्याही वाईट आणि चांगल्या प्रसंगी उभे असतात. म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताने निर्भय होऊन कोणालाही आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरता आपले कर्म करावे. आणि श्री स्वामी समर्थांचे नित्य नामस्मरण करावे.
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||