msanglikar

 © महावीर सांगलीकर

अंकशास्त्राला किमान पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातील यहुदी लोक अंकशास्त्राचा वापर करत असत. प्राचीन चीनमध्येही अंकशास्त्र विकसित झाले होते. त्याच प्रमाणे प्राचीन भारतातही अंकशास्त्राचा उपयोग केला जात असे.

प्राचीन ग्रीसमधील प्रसिद्ध गणिती आणि तत्वज्ञ पायथ्यागोरस हा युरोपिअन अंकशास्त्राचा जनक मानला जातो.

अंकशास्त्रामागील संकल्पना

प्रत्येक व्यक्तिची जन्मतारीख म्हणजे एक अंक असतो. प्रत्येक अंकाचे कांही गुण आणि कांही दोष असतात. या अंकाचा त्या-त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि त्यामुळे जीवनावर प्रभाव पडत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, तिचा स्वत:कडे व इतरांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, येणा-या परिस्थितीला ती व्यक्ति कशा प्रकारे सामोरी जाईल आणि आणि ती व्यक्ति कोणत्या प्रकारचे जीवन जगेल याचा साधारण अंदाज बांधता येतो. हा अंदाज बांधण्यासाठी 1 ते 9 या अंकांचा वापर केला जातो.

 एखाद्या व्यक्तीच्या अंकशास्त्रीय वाचनावरून त्याचे मूलभूत गुण आणि दोष कळल्यामुळे त्यानुसार त्या व्यक्तीला आपल्या गुणांचा विकास आणि दोषांना काबूत ठेवण्याविषयी मार्गदर्शन करता येते. त्याला कोणते शिक्षण, रोजगार, व्यवसाय फायदेशीर ठरतील हे ठरवता येते. आयुष्याचा जोडीदार, व्यवसायातील भागीदार निवडताना अंकशास्त्राचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीस कोणती वर्षे, कोणत्या तारखा अनुकूल अथवा प्रतिकूल असू शकतात याचा अंदाज बांधता येतो.

अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे. ज्योतिषशास्त्रात व्यक्तिची जन्मवेळ अचूक माहीत असावी लागते. अंकशास्त्रीय वाचनाला जन्मवेळेची गरज नसते तर केवळ पूर्ण जन्म तारीख आणि व्यक्तीचे नाव या गोष्टीच महत्वाच्या असतात. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तिची खरी जन्मतारीख माहीत नसेल तर त्याची कागदोपत्रीय तारीख देखील अंकशास्त्रीय वाचनाला चालू शकते.

कांही लोक अंकशास्त्राचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडतात, पण ते चुकीचे आहे. कारण अंकशास्त्राचा संबंध ग्रहगोलांशी नसून अंकांशी आहे. प्रसिद्ध ज्योतिषी किरो याने म्हंटले होते की ज्योतिषशास्त्र, हस्त सामुद्रिक यांच्यापेक्षा अंकशास्त्र हे जास्त उपयोगी पडते.

पूर्ण लेख पुढे वाचावा: http://ankshaastra-numerology.blogspot.in/2014/02/blog-post_28.html

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,