Chota Kavi

महाराष्ट्र : Maharashtra Marathi
« on: August 09, 2012, 02:17:12 PM »
महाराष्ट्र या नावातच सारं काही आलं! महाराष्ट्र ! या राष्ट्रात विवधता अगदी ठासून
भरलेली आहे! इतिहास, निसर्ग, कला,
साहित्य, पाककलाह्या सगळ्यात इतकं
वैविध्य क्वचितच जगात आढळेल!
ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच
मातीतून शिवाजी,संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच
ते फळाला आले! इथेच अनेक अनामीवीर
स्वराज्यासाठी लढले आणी कैक
धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल
असेल का? प्रश्न अजूनही अनुतरित... त्याच
लाल मातीच्या भविष्या साठी उभारायचा आहे एकलढा, ह्या लढ्या साठी पाहिजेत
तुम्हा आप्तास्वकियाचे हात. चला उभारू
खरा अस्मितेचा लढा... जय मराठी, जय
महाराष्ट्र..!