Chota Kavi

गंगा जमुना डोळयात उभ्या का
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडूनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले, घुमवित घुंगुर वाळे
आठवले सारे सारे, गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली, खिलारी जोडी
बघ दिर धाकले बसले खोळंबून गाडी
पूस गं डोळे या पदराने, सावर ही साडी
रुप दर्पणी मला ठेवूनी जा

मोठ्याची तू सून पाटलीण मानाची
हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीन चुडे
बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरु परी आईला जा

simran254

 मराठी लेखक , कवी,marathi kavi,marathi writer,