Chota Kavi

महात्मा फुले
« on: December 26, 2011, 12:40:12 PM »
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Mahatma_Phule.jpg

त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोर्‍हे हे मूळ आडनाव होते. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तुकारामांप्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले. 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. स्स्र्वजनि सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

जीवन



१८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
१८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
१८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
१८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
२८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.

simran254

Re: महात्मा फुले
« Reply #1 on: June 24, 2022, 12:11:46 PM »
 Inspiration  ,आमचे प्रेरणास्थान,