लोकमंगल राजा सयाजीराव गायकवाड....(स्मृतिदिन :- ६ फेब्रुवारी १९३९)..
नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी १७ मार्च १८६३ साली जन्मलेले गोपाळ काशीराम गायकवाड, बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्यामध्ये दत्तक म्हणून गेले. पुढे ते महाराजा सयाजीराव गायकवाड नावाने उदय यास आले. सयाजीराव एक प्रजाहितदक्ष, आदर्श, लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी आपल्या छोट्याश्या संस्थानात विविध सामाजिक सुधारणा केल्या. काळाच्या पुढे असणारे राजे म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला.
सयाजीरावानी न्यायव्यवस्थेत सुधारणा केली, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब, गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण व कला शिक्षणाची सोय, संस्कृत ग्रंथ प्रदर्शन, दलितांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण याचबरोबर स्त्रियांना वारसा हक्क, बालविवाह बंदी, विधवा विवाह, कन्या विक्रीय बंदी अशा असंख्य सुधारणा त्यांनी घडवून आणल्या आणि आपल्या संस्थानात स्त्रीमुक्तीची पहाट घडवून आणली. प्रगाढ विचारवंत आणि अत्यंत पुरोगामी असणाऱ्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थानही भूषविले. १८८६ साली एका समारंभात सयाजीरावानी मुंबई येथे ज्योतीराव फुलेना महात्मा ही पदवी बहाल केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली. अशा या लोकमंगल राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ साली निधन झाले.
प्रजाहितदक्षी, लोककल्याणकारी राजाला कोटी कोटी प्रणाम.....!!
Raja Sayajirao Gaikwad