marathiadmin

फेरारी कि सवारी : लहान मुलांचा चित्रपट 

सिनेमा सुरु झाल्यानंतर काही क्षणातच आठवण येते ती गेल्या वर्षी  प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "ताऱ्यांच्या बेट " ची .

ज्यांनी "ताऱ्यांच्या बेट " बघितला असेल त्यांना फेरारी कि सवारी मुळीच आवडणार नाही .. कारण एक सरस चित्रपट आपण बघितलेला आहे आणि तेच कथानाक  थोडेसे बदलून ,.. थोडे हास्य , विनोद टाकून ,. विधू विनोद चोप्रा फार काही जादू करू शकले नाहीत ..

शर्मान जोशी ज्याने भूमिका केली आहे रुसी  डेबू ची . डेबू एक खूप प्रामाणिक सरकारी कर्मचारी असतो ,. तो रतो ऑफिस मध्ये कारकून असतो . त्याची प्रमिनिकता इतकी जास्त असते कि तो जेव्हा आपल्या मुलाबरोबर रस्त्यावरून जाताना चुकून सिग्नल तोडतो तेव्हा तो ट्राफिक पोलीस ला शोधून स्वतः दंड भरतो . डेबू आपल्या मुलाबरोबर (कायो) त्याच्या वडिलांसोबत राहत असतो .

चित्रपटाची सुरुवात होते ते क्रिकेट पासून शर्मान जोशी एक सामन्या पारशी कुटुंबातला सरकारी कर्मचारी असतो आणि त्याचा मुलगा कायो हा एक उत्तम क्रिकेटर असतो .. लहान असलेला कायो अतिशय छान क्रिकेट खेळतो त्याच्या शाळेतल्या सामन्यांमध्ये तो उत्तम कामगिरी करत असतो . त्यांच्या शाळेत एका लंडन मध्याला संस्थे काढून दीड महिन्यायचा एक ट्रेनिंग कॅम्प आयोजित केलेला असतो आणि त्यासाठी फीस असते तब्बल दीड लाख रुपये .

हे पैसे मिळवण्यासाठी डेबू चा चालेला संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न ह्या सिनेमा मध्ये केला गेला आहे .

पण चित्रपटामध्ये इतका दम नाही कि तो प्रेक्षक वर्गाला बांधून ठेवेन . शर्मान जोशी आणि बोमन इराणी यांनी जरी मेहनत घेतली असली तर चित्रपटच कथानक आणि सादरीकरण त्या चित्रपटां सारखे नक्कीच नाही ज्या साठी आपण विधू विनोद चोप्रा ला ओळखतो .

आमची टीम ह्या सिनेमा ला देते फक्त  ५/१० .


मी मराठी

simran254

 Bollywood Movie Reviews in Marathi,