रावडी राठोर : एक धम्माल विनोदी चित्रपट ..
प्रभू देवा , ज्याने ह्या चित्रपटासाठी अक्षय कुमारची निवड केली त्याचे अगोदर धन्यवाद म्हणायला हवे .. कारण ह्या भूमिके मध्ये मला नाही वाटत दुसरा कुणी बॉलीवूड मधला कुणी कलाकार काम करू शकला असता.
एक हलका फुलका दक्षिण भारतातील सिनेमा चा रिमेक अगदी छान असा बनविण्यात प्रभू देवाला नक्कीच यश आले असे म्हणता येईल .
चित्रपट सुरु होतो ते अक्षय कुमार च्या दिलखुलास कॉमेडी ने ... आणि संपतो ते त्याच्या तुफानी एक्शन ने ..
चित्रपटामधून घेण्यासारखे काहीच नाही पण चेहऱ्यावर हास्य देऊन जाणारा चित्रपट नक्कीच म्हणता येईल . छान गाणे , लक्ष्यात राहील अशी सोनाक्षी ची अदाकारी आणि झक्कास संगीत , नृत्य .
टीप : जर तुम्ही याचा दक्षिण भारतातील सिनेमा बघितला नसेल तर तुम्ही बिनधास्त ह्या सिनेमा ला जाऊ शकतात.
आमच्या टीम कडून या चित्रपटाला रेटिंग : ८/१०