msanglikar

एका धाब्यावर मस्तराम या सिनेमाचे पोस्टर बघितले. ते बघताच ‘असले फालतू सिनेमे का काढतात’ असा विचार मनात आला. पण  माझ्या सिनेमावितरक मित्राच्या आग्रहावरून त्याच्याबरोबर हा सिनेमा बघायला गेलो आणि तो बघताना माझे या सिनेमाबद्दलचे मत बदलले.

ही एका लेखकाची कथा आहे. मुन्शी प्रेमचंद यांना आपला आदर्श मानून त्यांच्यासारखाच एक महान लेखक बनण्याचे स्वप्न बाळगणारा राजाराम हा एक लेखक. एका बँकेत त्याला चांगली नोकरी. घरी सुंदर बायको. बँकेत कामापेक्षा लिखाणातच वेळ घालावाणारा. त्यामुळे मॅनेजराशी भांडण होते आणि तो लेखक नोकरीचा राजीनामा देतो. त्याच्या उच्च साहित्यिक मुल्ये असणा-या कादंब-या छापायला कोणताच प्रकाशक तयार होत नाही. एक प्रकाशक त्याला अश्लील कथा लिहिण्याची मागणी करतो. पैशांची गरज असल्याने राजाराम तशी एक कथा त्या प्रकाशकाला लिहून देतो. तिचा प्रचंड खप होतो. मग काय, राजाराम दरमहा अशा कथा लिहायला लागतो. प्रकाशक ‘मस्तराम’ नावाचे मासिकच सुरू करतो. राजारामला अशा लिखाणातून भरपूर पैसे मिळू लागतात.

इकडे घरी बायकोला आपला नवरा लेखक झाला आहे हे माहीत असते, पण तिने त्याचे लिखाण वाचलेलेच नसते. ती त्याच्या पुस्तकाची मागणी करते तेंव्हा लेखकाची पंचाईत होते. तिला शंका येते, म्हणून ती नव-याच्या महेश या मित्रास हा प्रकार आहे याचा घेण्याची विनंती करते. त्या मित्राला मस्तरामधील कथा राजारामच लिहित असतो याचा शोध लागतो.

राजारामला मूल झालेले असते. त्याच्या घरी त्याची पार्टी चालू असते. महेश मस्तरामचा नवा अंक घेवून राजारामाच्या घरी येतो. महेश जाम भडकलेला असतो, कारण नव्या अंकातील कथा राजारामाची बायको आणि महेश यांच्यातील काल्पनिक अनैतिक संबंधावर असते. महेश तो अंक राजारामाच्या बायकोला तसेच इतरांना दाखवतो, आणि राजारामची छी-तू होते.

साधारण अशी कथा असणारा-या हा सिनेमा कलात्मक ढंगाने जातो. सिनेमात परिचित चेहरे नाहीत. आंबट शौकीनांनी हा सिनेमा बघू नये, कारण त्यांच्या डोळ्यांना आणि मनाला सुख देणारे यात फारसे कांही नाही. नवोदित आणि भावी लेखकांनी मात्र हा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही. 

-महावीर सांगलीकर

माझ्या मराठी लघुकथा http://mahaakatha.blogspot.in/ येथे वाचाव्यात

simran254

 Bollywood Movie Reviews in Marathi,