"तू फुलकळी"
आठवतंय तुला..,
तू बिगी बिगी आलीस
शेजारी माझ्या बसलीस
दोन शब्द बोललीस
व्यथा तुझी मांडलीस
खरतर तू भरल्या डोळ्यानं आलीस अनं अथांग सागर रिकामा करून गेलीस
तुला धाय मोकलून रडताना पाहून
मलाच दया आली होती
कोणी कस अन्याय करू शकतं या नाजूकश्या फुलकळीवर
शंका मनात आली होती
सांगत होतीस तू
ऐकत होतो मी
शब्द तुझे मनात साठवून
तर्क वितर्काची माडी बांधत होतो मी
का झाला अन्याय फुलकळीवर
का घातले घाव या निष्पाप मुलीवर
बिचारी फुलकळी ती.., ठेऊन विश्वास भुंग्यावर
स्वाधीन झाली त्याच्या
साजला डाव त्याने
खून केला अस्मितेचा तिच्या
बिचारी फुलकळी हिरमुसली, कोमेजली
भास झाला तिला आता संपण्याचा
सर्वत्र फक्त अंधार
किरण मात्र कुठेच नाही प्रकाशाचा
हजारो फुलकळ्या दररोज कुस्करल्या अनं तोडल्या जातात या पापी भुंग्यांकडून
मात्र जाब विचारण्या भुंग्यांना कोणीच सरसावत नाही
कुस्करलेल्या हजारो फुलकळ्यांना माझं एकच सांगणं..,
अस्तित्व फुलांचं.. तू फुलकळी
श्वास फुलांचा.. तू फुलकळी
गर्व फुलांचा.. तू फुलकळी
सर्वस्व फुलांचं.. तू फुलकळी
मोहकता फुलांची.. तू फुलकळी
सन्मान फुलांचा.. तू फुलकळी
आत्मविश्वास फुलांचा.. तू फुलकळी
जीव फुलांचा.. तू फुलकळी
फुलकळी, सर्वस्व आहेस तू त्या फुलांची
अर्थात तुझ्या माय-बापाची
आता उठ पुन्हा नव्याने सुरुवात कर
अनं दाखव जागा त्या भुंग्याची
गाठूनी शिखरं तू उत्तुंग यशाची
तू फुलकळी... तू फुलकळी...
-विलास चव्हाण