Chota Kavi

सध्या मी कविता करणे सोडले आहे..
सध्या मी कविता करणे सोडले आहे..
कविता जगण्यातच मला धन्यता वाटते आहे..

कारण तिच्यासोबत जगताना... कविता ही सुचत नाहीयेत...
कविताही सध्या तिला पाहून लाजत आहेत...

माझे बोलणे तिला कविता वाटतेय...
पण खरं तर तिच्याशी बोलताना अशीच कविता सुचते आहे..

ती नको म्हणताना परत परत कविताच करतोय...
त्या तिच्यावर आहेत, हे तिला माहीत असूनही फक्त तिलाच ऐकवतोय...

असे मज का व्हावे असा प्रश्न मला पडतोय..
तो तिला विचारायच्या आधीच तिचे हास्य मला उत्तर देतय..

तिचे ओठ खूप काही सांगताहेत..
पण माझी नजर मात्र तिच्या नजरेत कैद आहे...

तिच्या डोळ्यातच मी चंद्र तारे शोधत आहे..
रात्र अशीच सरत आहे..

सध्या मी कविता करणे सोडले आहे...

simran254

 मराठी कविता ,Marathi Kavita, गंभीर कविता , Gambhir Kavita,