अजुनही वाहतात का ते वारे ?
गर्द वनराईत
ते गोड पाण्याचे झरे ?
अजुनही ,
उमलतात का ती फुले ..
अन बागेमध्ये त्या
अजूनही झुलतात का झुले ?
अजुनही ,
कोसळतात का धारा
भिजुनी चिंब मग तू
वेचतेस का गारा ?
अजुनही ,
का दाटते डोळ्यांत पाणी ?
ओंजळीतल्या फुलांसोबत ,
का येतात माझ्या आठवणी ?
अजुनही ,
जगतेस माझी बनुनी ...
पुन्हा तुझ्याचसाठी
घेईन जन्म फिरुनी !