Chota Kaviडोळ्यातले पाणी
पापण्यात लपवायचे असते
मनातले दुक्ख
मनाताच रेचायचे असते

दुक्ख सर्वाना सेम असते
कमी जास्त होतच असते
आपले दुक्ख जास्त म्हणून ते
चव्हाट्यावर मांडायचे नसते

हसत नेहमी जगायचे असते
जीवनात कधी रडायचे नसते
आली किती संकटे तरी
मनाने कधी घाबरायचे नसते

दुक्खानंतर सुख असते
हे कधी विसरायचे नसते
कोणाला लवकर तर कोणाला उशिरा
काळानुसार मिळत असते

१०० धागे दुक्खाचे तरी
एक मात्र सुखाचा असतो
तया सुखाच्या क्षणासाठी
मनाला तयार करायचे असते

जग खूप स्वार्थी असते
स्वार्थी आपण बनायचे नसते
या जगाच्या एक पावूल पुढे
नेहमी आपण चालायचे असते
दुक्ख आपले जास्त म्हणून
चव्हाट्यावर ते मांडायचे नसते

संकटाना जो सामोरे जातो
तोच खरे जीवन जगतो
जीवन आपले आपणच घडवतो
नशिबाला दोष दयायचा नसतो

simran254

 मराठी कविता ,Marathi Kavita, गंभीर कविता , Gambhir Kavita,