कशाला आतुरता ही गणरायांची
त्यांच्या रंगात रंगण्याची
लागे स्पर्धा नगरात महाराजाची
दर्शनासाठी गर्दी ती धक्का बुक्कीची
कशाला आतुरता ही गणरायांची...
दिवस रात्र जागुनी
उभारी मंडपासाठी वेळ,
त्या विघ्नहर्तास विसरुनी
मांडी मंडपामागे खेळ
कशाला आतुरता ही गणरायांची...
उडवूनी तो गुलाल
करी गणरायाचे आगमन,
एकदंताचे होईल नयन लाल
कोण जाणणार अंतरीचे मन,
कशाला आतुरता ही गणरायांची......
गणेशाला करुनी नवस
करी सोन्या चांदीचे ते दान,
आवडे भक्ति भाव देवास
कोण सांगणार यांना याचे भान,
मग कशाला आतुरता ही गणरायांची...
आता वेळ आली त्यांच्या भक्तीत रंगण्याची...!!!
कवि:- रवी सुदाम पाडेकर
घाटकोपर, मुंबई