sachinikam

लढा
« on: August 27, 2015, 02:43:58 PM »
लढा

इथे कायम चाललाय लढा
कुणाचा तरी कुणाशी

काहीतरी मिळविण्यासाठी
काहीतरी जुळविण्यासाठी

सजीवाचा निर्जीवाशी
मानवाचा निसर्गाशी

कर्माचा नशिबाशी
कर्तृत्वाचा नियतीशी

मनाचा बुद्धीशी
सत्याचा अन्यायाशी

सुखाचा शश्वततेशी
प्रजेचा सत्तेशी

संपत्तीचा आपत्तीशी
कमाईचा खर्चाशी

रंकाचा रावाशी
शहरांचा गावाशी

क्रांतीचा जुलुमाशी
परिवर्तनाचा पुरातनाशी

नाविन्याचा रटाळाशी
रक्ताचा रक्ताशी

पिढीचा पिढीशी
जीवनाचा जीवनाशी

जिंकण्याचा हरण्याशी
जगण्याचा मरण्याशी

काहीतरी करण्यासाठी
जीवनध्येय गाठण्यासाठी

आयुष्यभर मांडलाय लढा
आयुष्य सफल बनविण्यासाठी.
----------------------------------
कवितासंग्रह : मुकुटपीस
कवी : सचिन  निकम
पुणे
९८९००१६८२५
[email protected]

----------------------------------
https://www.facebook.com/MukutPees/photos/pb.524097061055994.-2207520000.1440668920./524098257722541/?type=1&theater

simran254

Re: लढा
« Reply #1 on: June 18, 2022, 05:44:16 PM »
 मराठी कविता ,Marathi Kavita, गंभीर कविता , Gambhir Kavita,