बालपणीचे जीवन खूप छान होते..
कोणतीही गोष्ट कशी करायची ते भान नव्हते...
का?? आले मी या तरुण वयात...
कोणताही पुरूष केव्हाही करेल माझा विश्वासघात....
हे आयुष्य मी माझ्या परीने जगावे असे मलाही वाटते...
पण तेच आयुष्य जगायचं म्हंटलं कि,
काळजात कुठे तरी परकेपणाची जाणीव भासते
लोक का करतात?? माझ्यावर इतका अत्याचार.
कधीतरी समजून घ्या माझे पण विचार...
माझ्या आई वडिलांनी केलेत माझ्यावर चांगले संस्कार...
पण तरीही वाईट नजरेने का बघतो मला हा सारा संसार....

जीवन जगण्याचा नाही का मला अधिकार..??
मलाही हे आयुष्य जगू द्या..हेच करा माझ्यावर उपकार...👈