-महावीर सांगलीकर
पुढील सोपे उपाय केल्यास तुम्ही नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अनेक अडचणींवर सहज मात करता येते आणि पुढे येणा-या अडचणी टळतात. तुमच्या यशाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे.
1. तुमचा चेहरा नेहमी हसरा ठेवा. त्याच्यावर दु:ख, वैताग, राग, उदासपणा अशा भावनांचा लवलेशही दिसू देऊ नका. चेहरा हसरा ठेवणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे. याउलट चेहरा दु:खी, उदास, रागीट, वैतागलेला ठेवण्यास तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. शिवाय असा चेहरा ठेवण्याने लोक तुमच्यापासून दूर जातात. याउलट हस-या चेह-यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. हस-या चेह-यामुळे तुम्ही प्रसन्न, आनंदी आणि पॉटझिटिव्ह रहाता, शिवाय तुमचा मित्रपरिवार वाढतो, आणि तुमचे क्लाएंट्सही वाढतात. तुमच्या यशाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे.
2. लोकांशी आपुलकीने बोला. तुमचे हे बोलणे मनापासून पाहिजे. मनापासून आपुलकीने बोलण्यामुळे तुम्ही आनंदी रहाता आणि याच्यातून लोकांच्यामध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार होते.
3. एखादी तोंड ओळखीची, फारसा संबंध नसलेली व्यक्ति भेटली तरी त्या व्यक्तिकडे बघून हसा. ‘हाय, हॅलो’ करा. अगदी अनोळखी व्यक्ति भेटली आणि ती तुमच्याकडे बघून हसली, तरी ती कोण आहे याचा विचार न करता तुम्हीही हसा.
4. आनंदी, यशस्वी आणि पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत रहा. निगेटिव्ह, अपयशी, सतत दु:खी आणि व्यसनी लोकांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहा. विद्रोही. टीकाखोर लोकांपासूनही दूर रहा.
पुढे वाचा:
http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/12.html