msanglikar

-महावीर सांगलीकर
9623725249

ज्ञान मिळवण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यातला श्रेष्ठ प्रकार म्हणजे दुस-या कुणाच्या मदतीशिवाय स्वत:च मिळवलेले ज्ञान. हे स्वत: चिंतन करून, अभ्यास करून मिळवता येते. Self Study is Supreme Study.  पण अशा प्रकारे ज्ञान मिळवणे फारच थोड्या लोकांना शक्य असते, कारण त्यासाठी लागणारी पात्रता, बुद्धिमत्ता सगळ्यांच्यात नसते. या प्रकारे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला सामान्य माणसांसारखे वागून चालत नाही. तुम्ही सामान्य माणसांपेक्षा वेगळे व्हावे लागते. तुम्ही जर असामान्य असाल तर मग तुम्हाला या प्रकारे ज्ञान मिळवणे सहज शक्य असते.

तुम्ही जर असामान्य असाल तर तुम्हाला मी किंवा आणखी कुणी ज्ञान कसे मिळवावे हे सांगायची कांहीच गरज नाही.

ज्ञान मिळवण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ज्ञानी लोकांच्याकडून ते मिळवणे. तुम्हाला या प्रकारे ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही खालील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

1.    तुम्हाला ज्या व्यक्तीकडून ज्ञान मिळवायचे आहे, ती व्यक्ति खरेच ज्ञानी आहे याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या ज्ञानी व्यक्तीबाबत चार जाणकार लोकांकडून माहिती करून घ्यावी लागेल, तसेच प्रत्यक्ष ज्ञान मिळवताना तुम्हाला तुमची प्रज्ञा वापरून ती व्यक्ति खरेच ज्ञानी आहे की नाही हे ठरवावे लागेल.

2.    ती व्यक्ति धर्म, पंथ, देश, प्रदेश, भाषा वगैरे कोणत्याही बाबतीत पक्षपाती नसली पाहिजे. ती व्यक्ति ज्ञानाच्या बाबतीत विशिष्ठ परंपरेची आग्रही नसायला पाहिजे, आणि त्या व्यक्तिचे ज्ञान तौलनिक (Comparative) असायला पाहिजे.

वरील गोष्टींची खात्री पटली की तुम्ही त्या व्यक्तीकडून ज्ञान मिळवायला हरकत नाही. ते मिळवताना तुम्ही खालील पथ्ये पाळली पाहिजेत.

पुढे वाचा:
http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_24.html