marathiadmin

कोणत्याही माणसाला ओळखणे सोपे नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे, हे ओळखणे सोपी गोष्ट नाही. आचार्य चाणक्य यांनी आपल्याशी निगडीत व्यक्ती ओळखण्याच्या वेगवेगळ्या वेळा सांगितल्या आहेत.

आचार्य यांच्यानुसार नातेवाईक किंवा मित्र यांना ओळखण्याच्या वेळा वेगळ्या असतात आणि आपल्या बायकोला पारखण्याची वेळ वेगळी.

जेव्हा एखाद्याच्या जीवनात घोर संकटे येतात अशा वेळी पत्नीची खरी परीक्षा असते. वाईटातल्या वाईट परिस्थितीतही पतीची साथ देणारी स्त्री ही पतिव्रता आणि श्रेष्ठ असते.

सुखात असताना तर सर्वच जण साथ देतात. तुमच्याकडे पैसा असेल, समाजात मान सन्मान असेल तर छोट्या मोठ्या अडचणीत तुमच्या पाठीमागे अनेक जण उभे राहतात. परिस्थिती बदलली, तुमचे धन नष्ट झाले, समाजात मान सन्मान मिळेनासे झाले तर अशा वेळी नातेवाईक आणि मित्रांकडून अपेक्षा असते की ते मदत करतील. कधी कधी नातेवाईक आणि मित्रही आपल्या वाईट काळात साथ सोडतात. आणि अशा वेळी पत्नीची साथ मिळाली तर मोठ्यात मोठ्या संकटातून बाहेर पडता येते. कठीण समयी ज्या माणसाची बायको साथ देत नाही त्या पुरुषाचे जीवन नरकासारखे होऊन जाते.
मी मराठी