Pallavi08

निसर्गाच्या अनेक सौंदर्यांपैकी एक सौंदर्य आपण स्त्रिया आहोत. प्रेम, माया, आपुलकी या सगळ्यामुळेच आपले अंतरंग खऱ्या अर्थाने समृध्द आहेच पण निरोगी राहण्यासाठी आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला प्रेझेंटेबल करण्यासाठी शारिरिक निगा राखणे देखील आवश्यक आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना आणि वेगवेगळ्या वातावरणात काम करताना भरडली जाते ती आपली त्वचा. त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रदूषण. या प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. परिणामी त्वचेवर ओरखडे येणे, त्वचा निस्तेज दिसणे, काळवंडणे डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पिंपल्सच्या समस्या या आणि अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशा समस्यांच्या बाबतीत आपण जास्तच संवेदनशील असतो नाही का ? मग अशा समस्यांवर इलाज म्हणून अनेक पर्याय डोळ्यासमोर पिंगा घालायला लागतात. बाजारात देखील सौंदर्य प्रसाधनांची काही कमी नाही त्यामुळे हे प्रोडक्ट वापरू की ते प्रोडक्ट वापरु अशा विचाराने चंचलता येते आणि ते प्रोडक्टस आपल्या त्वचेसाठी योग्य असतीलच याबद्दल मात्र साशंकता असतेच. अशा परिस्थितीत घरगुती नैसर्गिक उपायांचा पर्याय केव्हाही चांगलाच नाही का ? अशा घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींमध्ये रासायनिक बाबींचा भडिमार नसतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुक्सान होण्याची शक्यता नसते काळाच्या ओघात अशा उपायांचा थोड्याफार प्रमाणात विसर पडलाय. त्यामुळे या उपायांबद्दल जागरूक होण्याची हीच खरी योग्य वेळ आहे .
अधिक माहितीसाठी भेट द्या - http://zeemarathijagruti.com/blog/jaagrutichi-saath-milnaar-aani-sundar-mi-honaar