Chota Kavi

विदर्भातील थंड हवेचे ठिकाण 'चिखलदरा' (ता.चिखलदरा,जि.अमरावती)

चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

-आख्यायिका-

चिखलदऱ्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने अंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

-निसर्ग-

चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.

-प्रेक्षणीय स्थळे-

( चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत.)

पंचबोलचे नाव इको पॉईंट.
मंकी पॉईंट
बेलाव्हिस्टा पॉईंट
लॉग पॉईंट
प्रॉस्पेट पॉईंट
बेलेन्टाईन पॉईंट
लेन पॉईंट
हरिकेन पॉईंट
वैराट पॉईंट
भीमकुंड
नर्सरी गार्डन
देवी पॉइंट

कडाक्याच्या गरमीने हैराण असाल तर एकदा चिखलदरयाला अवश्य भेट द्या.. :)

simran254

 महाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism  Hill Stations in Maharashtra ,  विदर्भातील थंड हवेचे ठिकाण 'चिखलदरा' (ता.चिखलदरा,जि.अमरावती),

simran254

 महाराष्ट्र पर्यटन , Maharashtra Tourism,