Chota Kavi

तोरणमाळ हिल स्टेशन (जि.नंदुरबार)

तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसर्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.
अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते
महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षण ठरलेले नंदुरबार जिल्ह्यायातील तोरणमाळ हे पर्यटन स्थळ सातपुडा पर्वताच्या चौथ्या पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून १ हजार ७६ मीटर उंचीवरचे हे ठिकाण आहे. शुध्द मोकळी गार हवा डोंगर, खोल दर्यांचे असे हे ठिकाण आहे. अशा या पर्यटन स्थळाविषयीची सविस्तर माहिती पर्यटन प्रेमींसाठी लोकराज्यने उपलब्ध करून दिली आहे. त्यातील थोडक्यात माहिती...

नंदुरबार जिल्हा मुख्यालयापासून ९५ किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी १२ माही पाणी साठा असलेला प्रचंड यशवंत तलाव, खडकी पॉईट, सिताखाईची खोल दरी, सनराईज व सनसेट पॉईटसह घाट रस्ता चढतांना लागणारा सात पायर्यांचा घाट रस्ता पर्यटकांचे मन मोहित करतो. मत्स्येंद्रनाथाची गुफा आणि अनेक ऐतिहासिक धार्मिक मंदिरे पर्यटकांना पाहण्यासाठी खिळवून ठेवणारे असे हे ठिकाण आहे.

या ठिकाणी शहादावरुन म्हसावद मार्गे जातांना केवळ ४० किलोमिटर एवढे अंतर आहे. या रस्त्यावर राणीपूर या गावापासून २७ किलोमिटर वळणांचा सुंदर घाट रस्ता आहे. तोरणमाळ येथील वार्षिक पर्जन्यमान १ हजार ५० मिलीमिटर एवढे आहे.

simran254

 महाराष्ट्र पर्यटन , Maharashtra Tourism,