२७ फेब्रुवारी : मराठी राजभाषा दिवस
💐कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे.
ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७व्या वर्षापासून 'बालबोधमेवा' या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२मध्ये प्रसिद्ध झालेला 'विशाखा' हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.
▪कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. 'नटसम्राट' या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर १९८८मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते.
'माय मराठी'चा देशात तिसरा नंबर ?
👏भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ आणि भाषा पाहायला मिळतात. त्यामुळेच भारत हा विविधतेत एकता असलेला देश म्हणून जगभरात ओळखला जातो. भारत देशाची प्राकृतिकदृष्या रचना करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील विविध राज्यांत त्यांच्या प्रांताचीच भाषा मूळ किंवा मातृभाषा म्हणून बोलली जाते. देशात जवळपास 800 भाषा आणि अंदाजे 200 बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र, एका सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी असून मराठीचा देशात तिसरा क्रमांक लागतो. देशात मराठी बोलणारांची संख्या 7.1 टक्के आहे.

READ FULL INFORMATION GO TO LINK :-
https://www.informationinmarathi.in/2019/02/marathi-day-information-in-marathi.html