Chota Kavi

आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!

काय वाटते मला कशास कोण ऐकतो?
आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!

रंग वेदनांस देत राहतो नवे नवे
शेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो

मानले ललाटरेष खोडता न येतसे
चौकटी हव्या तशाच पत्रिकेत मांडतो

माझिया मनात काय, ऐक एकदातरी...
जीवना तुझ्यासवे कधीकधीच भांडतो...

रोज रोज मी भिकार, सावकार रोज तू
डाव जाणतो तुझा, तरी मजेत खेळतो!

Unknown Author...

simran254

मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,  मैत्रीवर मराठी चारोळ्या , Maitrichya Marathi charolya,