Tejasvi

नाच रे मोरा
« on: June 08, 2012, 06:45:17 PM »


नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच


ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...


झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...


थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...


पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

Rajmahendra

Re: नाच रे मोरा
« Reply #1 on: July 20, 2018, 11:14:29 PM »
मराठी गाणी किती सुंदर होती..,पण आता इंरजी  आली...  काय उमजत नाही.