माझी सानुली
« on: June 06, 2011, 10:56:33 AM »
संध्याकाळी दारात सदा वाट पाहणारी ,
शाळेत जाताना पाणी डोळ्यात आणणारी ,

उशिरा आलो तर भीतीने भांबावलेली ,
कठोर वागलो तर अबोला धरणारी ,भांडणारी ,

मनाविरुद्ध दुसरा कोण बोललं तर येवून तक्रार करणारी ,
कामासाठी दूर गेलो ,
आणि तुझा उमलण बघायला मिळेना ,

परत जाताना हिम्मत नव्हती तुझ्या डोळ्यात बघण्याची ,
त्यातील भीती ,चिंता दिसायची ,

बाबा परत नाही आला तरची,?
परतल्यावर तू मित्रा ,मैत्रीनीमध्ये,

दुरून बघत स्वतः शीच हसायचो ,
तुझी स्वप्ने बघत झोपी जायचो ,

कळले पण नाही ,नाते कधी मैत्री मध्ये बदलले ,
तेव्हा माझे मन तुला कळेल असे वाटले ,

आता तू उंबरा पार करणार ,म्हणून डोळ्यात पाणी येते ,
एकातून बाहेर पडते ,मित्रा म्हणून आनंदाचे ,

दुसरे मात्र तिथेच थिजते ,निशब्द होते ,काळजीने ,
मागणे आता एकचं तुझ्याकडे ,

कधी कठोर वागला असेल हा बाप ,
पण ते तुझ्या भल्या साठी ,हितासाठी ,

पण नंतर गच्चीत जावून रडला आहे हा बाप ,
तुझ्यासाठी सदा आठवत तू मारलेली ,आनंदाने ,
बाबा म्हणून पहिली मिठी..

महेश पटवर्धन

simran254

Re: माझी सानुली
« Reply #1 on: June 20, 2022, 01:50:48 PM »
 मराठी कविता,(Marathi Kavita, बालगीत , Marathi BalGite ,