sachinikam

डॉली
« on: April 10, 2015, 05:30:39 PM »
डॉली

डॉली ग डॉली छान माझी बाहुली
कपाळी टिकली छान छान लावली
काळे कुरळे केस, गुबरे गुबरे गाल
गोरी गोरी पान, ओठ लाल लाल

डॉली ग डॉली छान माझी बाहुली
सानुली छकुली, इवलिशी चिमुकली
साजिरी गोजिरी जराशी लाजरी
गुदुगुदु पोटावरी खुद्कन हसली

डॉली ग डॉली छान माझी बाहुली
गोड गोड दिसते मायेची सावली
हलकी फुलकी, फुलांची पालखी
चालकी बोलकी, खूप खूप लाडकी

डॉली ग डॉली छान माझी बाहुली
चिऊताई, हंबागाई भेटायला आली
चल चल खेळायला खेळणी मांडली
अग अग जपून, वाटी दुधाची सांडली

डॉली ग डॉली छान माझी बाहुली
उगी उगी रुसली, शहाणी माझी तानुली
आई गेलीय बाजारला, खाऊ सांगितलाय आणायला
बाबा गेलेत ऑफिसला, जाऊ संध्याकाळी फिरायला

डॉली ग डॉली छान माझी बाहुली
गालावरची खळी, आता कशी खुलली
साजिरी गोजिरी जराशी लाजरी
गुदुगुदु पोटावरी खुद्कन हसली

------
कवितासंग्रह: मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
-----

simran254

Re: डॉली
« Reply #1 on: June 20, 2022, 01:56:40 PM »
 मराठी कविता,(Marathi Kavita, बालगीत , Marathi BalGite ,