Chota Kavi


ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे

- गीतकार   :जगदीश खेबुडकर
  गायक   :लता मंगेशकर
  संगीतकार   :आनंदघन
  चित्रपट   :साधी माणसं - 1965


simran254

मराठी संगीत ,Marathi Sangeet ,मराठी गाणे, मराठी गाणी ,Marathi Gaane ,Marathi Gaani,