marathiadmin



कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय् डौलात न् खुदूखुदू हसतंय् गालात
कसं लबाड खुदूखुदू हसतंय,
कसं कसं बघतंय् हं

... आपल्याच नादात ग बाई बाई
आपल्याचं नादात मान करून जराशी तिरकी,
भान हरपून घेतंय् गिरकी
किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात,
न् खुदूखुदू हसतंय् गालात

कशी सुबक टंच बांधणी,
ही तरुण तनु देखणी
कशी कामिना चुकून आली ऐने महालात,
न् खुदूखुदू हसतंय् गालात

लाल चुटुक डाळिंब फुटं,
मऊ व्हटाला पाणी सुटं
ही मदनाची नशा माईना टपोर डोळ्यांत,
न् खुदूखुदू हसतंय् गालात

गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीत : राम कदम
गायक : उषा मंगेशकर
चित्रपट : सुशीला
मी मराठी

simran254

Re: कुण्या गावाचं आलं पाखरू
« Reply #1 on: June 24, 2022, 10:11:47 AM »
मराठी संगीत ,Marathi Sangeet ,मराठी गाणे, मराठी गाणी ,Marathi Gaane ,Marathi Gaani,