Marathi Kavita - आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा (Aakashi zep ghe re pakhara)
गायक :सुधीर फडके
चित्रपट :आराम हराम है
आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा
तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा
घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा
तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरीता सागरा
कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परी ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा
Singer :Sudheer Phadke
Movie :Aaram Haram Aahe
Marathi Kavita - आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा (Aakashi zep ghe re pakhara)