तो फुलं सांडत राहतो
आम्ही काटे शोधण्यात मग्न
तो क्षणाक्षणाला शिकवतो
आमची बुद्धी पार नग्न
तो हास्य पसरवतो
आम्ही अश्रूं विकत घेतो
तो दिपस्तंभ, सर्वत्र दिसतो
आम्ही वाट चूकत जातो
तो सुख उधळतो
आम्ही दु:ख गोळा करतो
तो वटवृक्षा सारखा परसतो
आम्ही पाला पाचोळा करतो
तो अंतरी प्रेत्येक मनात
आम्ही त्याला दगडात शोधतो
तो बाळाच्या देहात वावरतो
आम्ही पापं करून कचऱ्यात टाकतो
तो श्वासां मधला दूवा
प्रत्येक जीवजंतूत त्याचाच रंग
दुसऱ्यासाठी जगा त्याचा एकच मंत्र
आम्ही मास खाण्यात दंग
तो ज्ञानाचा प्रचार करतो
आम्ही बुद्धी असूनही अढाणी वागतो
तो ओंजळीतून लक्ष्मी देतो
आम्ही गोणीच्या गोणी मागतो
तो सूर वाहतो निसर्गातून
आम्ही संगीतबद्ध होत नाही
तो जिवनाचा हर एक पैलू उजळतो
आमचा गौतम बुद्ध होत नाही
तोच एकमेव शक्ती
प्रत्येक जिवात दडलेला आत्मा
तोच प्रकाश, तोच अंधार
तोच महात्मा, तोच परमात्मा
@सनिल पांगे
https://www.facebook.com/sanil.pange