Amar Kulkarni

चिकाटी
« on: December 31, 2021, 04:14:18 PM »
चिकाटी....

एक झाड वाळलेले, जमिनीवर उभे होते,
बहुतेक जमिनीशी त्याचे, जुने नाते होते. 
सूर्यास्ताच्या सोनेरी किरणात, उठून दिसले उनाड रानी,
जिद्द त्याला जगण्याची, जरी मिळत नव्हते पाणी. 
त्या झाडाभोवती फिरणारी, मला एक चिमणी दिसली,
तिच्या चिवचिवण्यात, होती चिंता कसली ?. 
तिच्या गिरक्यांनी मला, तिचे घरटे हरवल्याचे समजले,
तिची आता परीक्षा आहे, हे मला उमजले. 
आता काय करणार ?, या उत्सुकतेने माझे पाय थांबले,
त्याच वेळेस सूर्यास्ताचे, काही क्षण लांबले. 
त्याच वेळेस फांदीवर बसून, काही तरी विचार केली,
तेवढ्यात तिची नजर, खालच्या गवतावर गेली. 
झाडा वरून सरकन, खाली उतरली, 
इवल्याश्या चोचीने, सुके गवत कातरली. 
एक एक काडी घेऊन, झाडावर जायची,
झाडाच्या फांदीवर, घरट्यासाठी रचायची.  
सूर्य लवकरच मावळणार, तिला माहित होते,
म्हणूनच तिचे सर्व काम, खूप घाईत होते. 
उजेड संपून अंधाराची, सुरु झाली वेळ,
त्याच वेळी तिच्या, पंखात आले बळ. 
शेवटच्या अंधुक प्रकाशात घरट्याच्या, बांधून घेतल्या गाठी,
खरेच इवल्याश्या चिमणी ने, सोडली नाही "चिकाटी".. 
खरेच इवल्याश्या चिमणी ने, सोडली नाही "चिकाटी".. 

अमरजित विलासराव कुलकर्णी (मुरूमकर)
तालुका- उमरगा. जिल्हा - उस्मानाबाद. महाराष्ट्र.
मो. नं. ९८३४०१३६६३