Chota Kavi



तिथे पलीकडे
पैलतिरी..
नदीच्या शेजारी
निळसर रंगात..
त्या झाडाखाली..
बासुरी कोण वाजवते...!!!

सुमधुर दाटलेला स्वर
मनात गीत गातो..
मोगर्‍यात जाउन
हळूवार दरवळतो..
निळसर सुरात
त्या झाडाखाली..
बासुरी कोण वाजावतो...!!!

बहरलेला रानात
प्रीतीची फुले उमलतात..
रासलीला ती त्यांची पाहून
लाजतो सांजवेळेचा सूर्य
निळसर सूर्य रंगात आता
त्या झाडाखाली
बासुरी कोण वाजवतो...!!!

बासरीच्या प्रणयी सुरात..
पळत आल्या सार्‍या
गवळणी..
गालावरती लाली
लाल गुलाबी...
निळसर प्रितित
त्या तिथे झाडाखाली
बासुरी कोण वाजवितो...!!!

निळसर रंगात..
निळसर होण्यासाठी..
निळसर प्रितित
चिंब भिजण्यासाठी
निळसर प्रेमात..
तिथे झाडाखाली
बासुरी कोण वाजवितो...!!!

आल्या त्या सार्‍याजणी
कोणी गवळण होत्या..
तर कोणी राधा होत्या..
निळसर मिलनासाठी
तिथे झाडाखाली
बासुरी कोण वाजवितो...!!!

simran254

 मराठी कविता ,Marathi Kavita,