m4marathi Forum

मराठी कविता (Marathi Kavita) => मराठी कविता => Topic started by: charmingmanu on August 31, 2012, 12:14:44 PM

Title: ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Post by: charmingmanu on August 31, 2012, 12:14:44 PM
ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]

दोन पाय माझ्या ताईचे
घरभर मला फिरवनारे
दादा दादा म्हणत
आसमंत मिरवनारे....

दोन हात भावाचे
चालायला शिकविनारे
मार्गाताले अडथळे सारून
नवी वाट दाखविनारे...दोन खांदे बाबांचे..
हसत खेळ्त जिथे झालो मोठा
ज्यावर बसून पाहिल्या मी
आयुष्याच्या नागमोडी वाटा...

दोन शब्द मैत्रिनिचे..
मन शांत करणारे
गोंधळ गर्दी असतानाही
एकांतात गाथनारे...

दोन श्वाश मित्राचे
आधार देणारे खात्रिचे
आठवण बनून साठलेले
गप्पमाधाल्या रात्रिंचे...

दोन डोळे पत्निचे
पान्याने भीजलेले
रात्रभर वात पाहून
भल्या पहाटे निजलेले

एकच रुदय माझ्या आईचे
आन्तंकरणातल्या मायेचे
सगळे काही सामावनारे
आसमंतात ना मावणारे..

एवढे ॠण या जन्माचे
कधीही ना फिटानारे....


[Marathi Kavita

[Marathi Kavita
Title: Re: ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Post by: Prasad Savle on August 10, 2017, 09:43:19 PM
फार सुंदर कविता
Title: Re: ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Post by: SONALI KARANDE on August 19, 2017, 04:31:47 PM
खूपच छान  आहे कविता तुमची .....
Title: Re: ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Post by: अर्जुन आप्पाराव जाधव on August 06, 2019, 03:23:08 AM
खुपच छान कविता
Title: Re: ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Post by: Chota Kavi on June 01, 2022, 06:30:40 PM
मराठी कविता,प्रेरणादाई कविता,Marathi Kavita,Prendayi Kavita.
Title: Re: ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Post by: simran254 on June 25, 2022, 12:01:58 PM
 मैत्री कविता, Maitri Marathi Kavita,