माऊली
« on: August 06, 2019, 03:21:25 AM »
*🍁माऊली🍁*
__________________________


माऊली,
शब्द तुमचे , विचार तुमचे तुम्हीच महाज्ञानी ।
मला वाटले म्हणून देतो मी काय भोळा प्राणी  ।।

माऊली ,
तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनी । कमी नाही आम्हास पाणी ।।

माऊली ,
परंतु माय माता भूमीही तहाणली आता ।
पाणी पाणी म्हणती सर्व हीच सर्वांची व्यथा ।।

माऊली ,
सुज्ञ करा जना सांगा लावण्यास वृक्ष ।
दुष्काळ आहे वैरी सांगा टाळण्यास लक्ष ।।

माऊली ,
दुष्काळाने घातला आहे बघा कसा घाला ।
कळू द्या सर्वांस बुद्धि द्या सर्वाला ।।

माऊली,
करतो विनवणी म्हणे तुमच्या रूपा ।
सुखी ठेवा सर्वां करा एवढीच कृपा ।।

_______________________________
*🆕🦅भेटा अशाच प्रकारच्या माहितीसाठी...*
 https://nandanshivni.blogspot.com/2019/07/poem.html