मी एक थेंब...!!!
उघडा थोडे दार नभांनी
आता जावुद्या आम्हा खाली,
वाट बघती बळीराजा
कधी होईल माती, थेंबांनी ओली...
बरसू द्याना आम्हा,
वाट पाहतोय चातक पक्षी
थेंबासाठी आतुर असेल,
त्याची आम्हावरी लक्षी...
तयार झाल्या कागदी होड्या
तुडुंब वाहण्यासाठी,
खाली पडूनी तळे साचतो
त्यांना नेण्यासाठी...
घागर फिरते आमच्यासाठी
भरू दे आम्हा विहीरी
ढगाआड लपलेले थेंब
मोकळे करावे गहिरी...
करावे आम्हा मुक्त ढगातून
वार्याने झुळूक द्यावी,
होउनी एकरूप मातीतून
गंध ओलसर यावी
संदेश द्यावे या जीवितांना
गडगडाट ढगांनी करुनी...
येत आहोत आम्ही सारे
सांगावे , वीजांनी कडकडाट करुनी....
~रवि पाडेकर (मुंबई)
मो:-8454843034.