माणुसकी...!!!
कसे तरल हे मन
इथे जात खेकड्याची,
नजरेसमोर पडती धन
इथे चोच लालचीची...
इथे विदेशी पर्यटक
येई सुंदरता पाहण्यासी,
लुटोनी शोषावे किती,
निघतो स्वार्थ पहिला मनासी
पडे चुकून कुठे पाय,
नाही अंगी सहनतेचा दाह
थोडी दाखव माणुसकी,
उगी का करावे संदेह
कुणा अडती कुणाची नाव
वाटे मी पुढे , अहंकारी गाव
थोडी दाखव माणुसकी,
मिळूदे थोडी त्याला ही वाव...
कुणा पेटले ते घर
जीव फसले आगीत
चटके सोसत सोसत
मागे दोन्ही हात मदत
लोप पावली माणुसकी
येईल कशी ती धावूनी
सार्यांच्या हातात SmartPhone
घेई ज्वाळ आगीचा टिपुनी...
पाहिली माणुसकी जळताना,
अजून मोबाइलमध्ये जीव जळतांनी.....
कवि:- रवि पाडेकर (मुंबई)
मो:- 8454843034.