देवा मला श्रीमंती दे.....
********************************
आहे ! गरीब मी देवा मला श्रीमंती पाहीजे |
जगण्यासाठी फक्त मला पैसा पाहीजे |
नको मला सगे सोयरे फक्त पैसा पाहीजे |
मिळेल सर्व सुख मला देवा पैसा पाहीजे ||
नको ती गरीबी देवा देवु माझ्या वाट्याला |
गरिबी नको श्रीमंती हवी माझ्या वाट्याला |
एकच मागणी आता तुजला माझी |
नको हेवा-देवा मला फक्त पैसा पाहीजे |
भांडणी-तंटा नको मला फक्त सुख पाहीजे ||
पैसा येता जवळी सर्व मिळेल मला |
पैसा जवळी येता लोक ' जी ' मनतील मला |
सुख संपत्ती येईल माझी पैसा दे मला |
नको आता ही गरीबी, श्रीमंती दे मला ||
लोकांनी श्रीमंतीस मान दिला,
गरीबाला घातल्या लाता |
आदर, मान कोलमडुन गेला,
जणु श्रीमंतीस मान येता |
मान सन्मान मिळेल मला जवळी पैसा येता |
नको आता ही गरीबी, श्रीमंती दे मला ||
- नखाते राम
मो.नं. ९५४५०१३६७९
मांडणी, ता.अहमदपुर,
जि. लातुर.