सुंदर असते
कोणी कायेने सुंदर असते
कोणी मनाने सुंदर असते
कोणी संस्काराने सुंदर असते
कोणी विचाराने सुंदर असते
प्रत्येक मुलगी सुंदर असते
कोणाची चाल सुंदर असते
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते
प्रत्येक मुलगी सुंदर असते
कोणाचे गाणे सुंदर असते
कोणाचे लिखाण सुंदर असते
कोणाचे कविता सुंदर असते
कोणाचे वस्त्र सुंदर असते
प्रत्येक मुलगी सुंदर असते
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका
मनाची सुंदरता विसरू नका
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर
आणि शरीराच्या भूमितीवर करू नका
मनाच्या भूमितीचा अभ्यास
करा.आणि सुंदरता ठरवा
कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते....
