गुढीपाडवा
आला आला गुढीपाडवा
कडूनिंबा लागे अमृताचा गोडवा
चला चला ग सयानो
अंगनी टाकू सडा
रंगबेरंगी रांगोळी काढा
चौकटीला नक्षी चान्द्रकोराची
अन स्वस्तिक कोरा
नेसुनी शालू नवा
लेवू हिरवा चुडा
नव्या वर्षाचा नवा उमंग
नव्या हर्षाचा नवा तरंग
आला आला वसंत नटून
दिसे पिंगारा उठून
गुलमोहर कसा फुलला
उल्हास मनामनांत खुलला
आले श्रीराम अयोध्या
स्वागत हार्दिक करूया
विजयध्वज गुढी उभारूया
नैवेध्या पुरणपोळीचा करूया
साडेतीन मुहूर्तात एक
होउदे शुभकाम प्रत्येक
सौभाग्य लाभूदे पदरी
सुखसमृद्धी नांदुदे घरी
केले आजच्या दिनी विश्व ब्रह्मदेवाने
केली आजच्या दिनी सुरु कालगणना शालिवाहनाने
आला आला गुढीपाडवा
कडूनिंबा लागे अमृताचा गोडवा
-----
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
-----