येरझारा
कुणा ना चुकला येरझारा
ना कुणा व्याधीउतारा
उगा तुडविशी संसार निखारा
शोधिशी कुठवर सुखाचा निवारा
मांडला जयाने विश्वाचा पसारा
रंगला खेळ तयाचा न्यारा.
कर्माची फळे आनंदे चाखशी
धर्माची खळे आंधळे राखशी
जन्ममरणाचा खेळ खेळशी
उगा दैवाचा मेळ शोधिशी
तोचि समर्थ व्यापला दाहीदिशी
राहा निर्भय तयाच्या भराविशी.
-----
कवितासंग्रह: मुखदर्पण
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
-----