sachinikam

शब्द
« on: April 10, 2015, 05:34:05 PM »
शब्द

शब्दांपासून ध्वनी प्रसवला, ध्वनीपासून ब्रह्मांड
अद्भूत किमया शब्दांची करती मुढास सज्ञान

कधी वाहती बनुनी प्रेमझरा
कधी ओघळती बनुनी अश्रुधारा
कधी रुळती ओठांवरती बनुनी हस्यापिसारा
कधी खेळती जनमनावरी बनुनी प्रेरित वारा

हे हे क्षेपणासत्रापरी प्रभावी, ह्यांत वज्र भेदण्याचे सामर्थ्य
कित्येक युगे उलटली भूमी पालटली, अजुनी अमर्त्य

अफाट शक्ती शब्दांमध्ये अन विलक्षण युक्ती
मिटवती कलह आपसातला, अन्यथा आपसांना मिटवती

शब्द अयोग्य चुकवि श्वास, निष्कारण जना करी निराश
शब्द अचिंत्य देई प्रकाश, व्यापुनी सारे धरणी आकाश

शब्दांच्या प्रज्ञेतून प्रसवले महामहामंत्र
शब्दांच्या प्रतिभेतून साकारले नवनवेतंत्र

वाणी शुद्ध प्रवाहे शुद्ध शब्दप्रयोगांमुळे
सुज्ञ तयासी समजावे तयाच्या शुद्ध विचारांमुळे .

कवितासंग्रह : मुकुलगंध
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
[email protected]


simran254

Re: शब्द
« Reply #2 on: June 20, 2022, 02:15:52 PM »
 मराठी कविता ,Marathi Kavita,