मन
मन म्हणजे एक पुस्तक
पान त्याचे उलगडून पहा
सुख दुःख आणि सर्व काही
सारे काही वाचून पहा
आरसा मनाचा समोर ठेवा
प्रतिमा तुमची त्यात पहा
पाप पुंण्याचे संतुलन करून
अर्थ त्याचा समजून पहा
मन असते मोठे भांडार
सर्व काही त्यात मावत
परीक्षा तुमची घेत असत
मार्ग तुम्हाला देत असत
लहान सहान छोट्या गोष्टी
कां तुम्हीं होता दुःखी
मनाची घालमेल होत रहाते
त्याची तसदी तुमच्या लेखी
मन तृप्त असावं लागत
नाही तर ते झगडत असत
मनाला साथ मिळावी लागते
हेच तुमचं कर्तव्य असत
महेश हळदणकर