vilaschavan2142

इनशर्ट
« on: December 08, 2017, 11:02:01 PM »
इनशर्ट

स्वप्नात आले डुबल सर
म्हणाले आधी इनशर्ट कर.
मला कळेना काय करू,
डुबल सर म्हणाले, का रें थोबाड फोडू ?
मग काय, नाईलाजास्तव इनशर्ट केला,
डुबल सर गेले पुन्हा इनशर्ट निघाला.
मग फिरू लागलो कॉलेजमध्ये मोकाट लांडग्यांसारखं, इकडून तिकडे... तिकडून इकडे...
पुन्हा डुबल सर दिसले अन कळेनाच नक्की जावं कुणीकडे.
मग काय गेलो ना वॉशरुमकडे... अर्थात.., इनशर्ट करायला.
आता काही कळेना, काय करावं सुचेना..
डुबल सरांच्या भीतीने इनशर्ट करावा कि माजुऱ्या माणसांसारखं कॉलेजभर फिरावं.
शेवटी खूप विचार केला अन ठरवलं मनाशीच कि..,
इनशर्ट केला, शिस्त पाळली म्हणून झाले डुबल सर.
आता मलाही करायलाच हवा इनशर्ट, पाळायलाच हवी शिस्त तरच होईन मी चव्हाण सर.
पण प्लीज, पुन्हा नका हं येऊ माझ्या स्वप्नी तुम्ही या अवतारात सर..,
कारण.., आज सुद्धा फार फार भीती वाटते हो तुमच्या त्या नजरेची सर... त्या नजरेची सर...

                                                                                                     - विलास चव्हाण


simran254

Re: इनशर्ट
« Reply #1 on: June 20, 2022, 02:24:49 PM »
 मराठी कविता ,Marathi Kavita,