मन म्हणजे असे ठिकाण ज्य़ामध्ये असतो सुखद-दु़:खद गोष्टींचा भलामोठा साठा,
जिथे एक विचार करता करता,दुसर्या विचाराला फुटलेला असतो फाटा.
क्षणाक्षणाला अनेक विचार येत असतात या मनात,
आणि या विचारांमध्ये आपण इतके गुंततो की बाकी काही नसत आपल्या ध्यानात.
असे हे मन आनंदी असेल तर तो आनंद लगेचच दिसून येतो,
आणि उदास असू तर ते तरी आपण कुठे लपवू शकतो.
अशा या आपल्या मनाच्या दोन बाजू असतात,
फारच कमी बाबतीत त्या एकमेकांशी सहमत असतात.
ऐकावे जनाचे करावे मनाचे या पंक्तीचा प्रत्येक निर्णय घेताना अवलंब करू,
उशिरा का होईना या निर्णयाच्या जोरावर निश्चितच विजय मिळवू शकू